Middle East Conflict : होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल! डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक दावा : म्हणाले ,”मी आणि अयातुल्ला मिळून त्यावर…”
Middle East Conflict :मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध आणि संघर्षामुळे जवळजवळ बंद असलेली होर्मुझची सामुद्रधुनी वाटाघाटी यशस्वी झाल्यास लवकरच पुन्हा उघडली जाणार आहे

Middle East Conflict : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध आणि संघर्षामुळे जवळजवळ बंद असलेली होर्मुझची सामुद्रधुनी वाटाघाटी यशस्वी झाल्यास लवकरच पुन्हा उघडली जाणार आहे, असा दावा केला आहे. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी ,”ते आणि अयातुल्ला मिळून कदाचित त्यावर नियंत्रण मिळवतील” असे गंमतीने म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, “इराणसोबत चांगल्या चर्चा झाल्यामुळे अमेरिका इराणच्या ऊर्जा नेटवर्कवरील हल्ले पाच दिवसांसाठी पुढे ढकलत आहे.” असे जाहीर केले होते. परंतु, या चर्चेत कोण सहभागी होते आणि कराराच्या अटी काय असतील हे अस्पष्ट होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा बाजारांवर लगेचच परिणाम झाला. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती घसरल्या, डॉलर कमजोर झाला, शेअर बाजार वधारले आणि सरकारी कर्जाचा खर्च कमी झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला Middle East Conflict :
इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने याविषयी महिती देताना, “अमेरिकेसोबत कोणतीही थेट किंवा अप्रत्यक्ष वाटाघाटी झालेली नाही” असे म्हटले आहे.. ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा आठवड्यात आले आहे, जो सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी गाजला आहे.
१८ मार्च रोजी इस्रायलने इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारच्या रास लाफान एलएनजी प्रकल्पाला लक्ष्य केले. इराणने इशारा दिला होता की, जर अमेरिकेने त्यांच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला, तर ते आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या तळांना वीजपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांवर हल्ला करतील.
होर्मुझ सामुद्रधुनीचे महत्त्व
होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील २० टक्के तेल आणि एलएनजीसाठी एक प्रमुख मार्ग आहे आणि २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यानंतर ती जवळजवळ बंद झाली होती. या हल्ल्यांमध्ये तत्कालीन इराणी सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनी मारले गेले.
ट्रम्प काय म्हणाले? Middle East Conflict :
फ्लोरिडामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “जर तेहरानसोबतची वाटाघाटी यशस्वी झाली, तर होर्मुझ सामुद्रधुनी लवकरच उघडेल. कदाचित अयातुल्ला आणि मी मिळून त्यावर नियंत्रण ठेवू.” ते गंमतीने पुढे म्हणाले, “कदाचित मी. कदाचित मी आणि अयातुल्ला, जो कोणी पुढचा अयातुल्ला असेल तो.”






