ऑस्ट्रेलियामध्ये अल्फ्रेड वादळामुळे मोठे नुकसान

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियामध्ये आलेल्या अल्फ्रेड वादळामुळे एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे आणि १३ सैनिक जखमी झाले आहेत. चक्रीवादळ अल्फ्रेड देशाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकत आहे. यामुळे तब्बल ३ लाख लोकांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मूळतः श्रेणी २ चे चक्रीवादळ असलेले अल्फ्रेड उष्णकटिबंधीय कमी दाबाच्या पट्ट्यात कमकुवत झाले. परंतु तरीही मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वहात आहेत.
त्यामुळे काल जमिनीवर आदळल्यानंतर तीव्र पूराचा इशारा देण्यात आला होता. वीज पुरवठ्यातही व्यापक व्यत्यय निर्माण झाले. आणखी मुसळधार पावसामुळे विशेषतः क्वीन्सलँडची राजधानी ब्रिस्बेनमध्ये अचानक पूर येऊ शकतो, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे. गुरुवारी रात्री करुम्बिन व्हॅलीमध्ये घरावर एक मोठे झाड पडल्यामुळे दोन जण थोडक्यात बचावले.
हे जोडपे झाड ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणापासून फक्त एक इंच अंतरावर पडले होते, असे पोलिसांनी सांगितले. क्वीन्सलँडमध्ये, झाडे पडल्यामुळे ४६ हजार घरे आणि व्यवसायांची वीज गेली होती, यातील बहुतेक ठिकाणे गोल्ड कोस्टमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यू साउथ वेल्समधील १९ हजार लोकांना दुपारपर्यंत त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्यथा पुराच्या पाण्यात अडकण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आपत्कालीन सेवांनी बाधित भागात गुडघ्यापर्यंत पाण्याच्या पातळीचा पूर आल्याची माहिती दिली आहे, यामुळे अनेक ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून सुमारे १,००० सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.





