Raj Thackeray : “ड्रीमलाइनरची सेवा खंडित करा” – राज ठाकरे

Raj Thackeray – अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. या विमानाला जगभरात बंदी असताना भारतात डीजीसीएने आधीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
इतकेच नाही तर कोणत्याही दबावाला बळी न पडता आता तरी तात्काळ या विमानांची सेवा खंडित करून देण्यात आलेल्या ऑर्डर रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जगभरात या विमानाच्या तक्रारी होत असतात त्याच दरम्यान हे विमान एअर इंडियाच्या सेवेत दाखल कसे झाले? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हे सर्व बोलण्याची ही वेळ नाही, असे म्हटले जाईल.
मात्र जी घटना घडली ती दु:खद आहे. म्हणून या विषयावर सरकारने आता तरी गंभीर्य दाखवायला हवे, असे देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.





