‘थांबवा हे सगळं’; समंथा रुथ प्रभू पापाराझींवर भडकली

Samantha Ruth Prabhu | अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले. समंथा जीममध्ये व्यायाम करायला गेली होती. यावेळी पापाराझी जीम बाहेर तिचे फोटो काढण्यासाठी वाट पाहत होते. ती बाहेर पडताच पापाराझींनी तिचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी तिच्याभोवती गर्दी केली. जे पाहून संमथा संतापली.
यावेळी तिचा मूड खराब असल्याचे पाहायला मिळाले. तिने पापाराझींना ‘थांबवा हे सगळं’, असं म्हटलं. मात्र, तरीही पापाराझी ऐकत नव्हते. त्यांनी तिच्या मागे-मागे जाण्याचा प्रयत्न सुरुच केला. त्यानंतर समंथा रुथ प्रभू भडकली आणि ‘प्लीज जरा थांबा,’ असं म्हणाली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काहींनी तिला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी तिच्या या वागण्यावर टीका देखील केली आहे. याआधी देखील पापाराझींवर काही सेलिब्रिटी चिडल्याचे पाहायला मिळाले आहे. Samantha Ruth Prabhu |
View this post on Instagram
;
दरम्यान, समांथा रुथ प्रभू व नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला. समंथा आणि नागा यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. 2021 मध्ये दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले. त्यानंतर नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली. Samantha Ruth Prabhu |
हेही वाचा :
५ दिवसांत दुसरा CDS ठार ! इस्रायलचा इराणवर आणखी एक मोठा हल्ला ; जाणून घ्या अली शादमानी कोण होते ?





