भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक; सुदैवाने कोणीही जखमी नाही

Bhusawal Nandurbar Passenger| अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर १२ जुलै रोजी उरूस असल्याने हजारो भक्तांची रेल्वेमध्ये गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून 11 वाजता सुटली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले होते.
मात्र भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही यात्रेकरूंनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले. यानंतर हजारो यात्रेकरू त्याठिकाणी उतरले. धक्कादायक म्हणजे काही समाजकंटकांनी रेल्वेवर तब्बल अर्धा तास दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे प्रवासी चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.
दरम्यान, व्हिडीओमध्ये अमळनेरजवळ शेकडो नागरिक जमले होते. ते पॅसेंजर ट्रेनवर दगडफेक करताना दिसून येत आहेत. ट्रेन अत्यंत संथ गतीने गतीने पुढे जात आहे. यावेळी ट्रेनमधील प्रवासी भीतीपोटी आरडाओरड करत आहेत. दररोज भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरमधून हजारो प्रवासी प्रवास करतात.
सर्वसामान्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरची ओळख आहे. त्यातच या पॅसेंजरवर दगडफेक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दगडफेक नेमकी का झाली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीनंतर काही वेळाने ही रेल्वे पुढील प्रवासाला रवाना झाली.
हेही वाचा:
जगात दर महिन्याला घडतेयं एक भयंकर घटना; शास्त्रज्ञांना वाटतेय जगाच्या अंताची भीती





