Stock Market : शेअर बाजारात जोरदार कमबॅक; सेन्सेक्स 483 अंकांनी वधारला, निफ्टी 22,750 पार
Stock Market : सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली. सेन्सेक्स 482.92 अंकांनी वाढून 73,606.75 तर निफ्टी 22,753.20 अंकांवर बंद झाला.

Stock Market : सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (26 ऑक्टोबर) जोरदार पुनरागमन केले. धातू, दूरसंचार आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला.
30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 482.92 अंकांनी (0.66 टक्के) वाढून 73,606.75 अंकांवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने 72,514.57 ते 73,606.75 अंकांदरम्यान व्यवहार केला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 153.20 अंकांनी (0.68 टक्के) वाढून 22,753.20 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्समधील अदानी पोर्ट्स, इटरनल, कोटक महिंद्रा बँक, ट्रेंट, टाटा स्टील, भारती एअरटेल, इंटरग्लोब एव्हिएशन आणि आयटीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, मारुती, एचसीएल टेक आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
गुंतवणूकदारांनी काही शेअर्सच्या कमी झालेल्या किमतींचा फायदा घेत खरेदी केली. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, भू-राजकीय अनिश्चितता आणि अमेरिका, युरोप व जपानच्या केंद्रीय बँकांच्या निर्णयांपूर्वीची सावध भूमिका यामुळे बाजारातील वातावरण पूर्णपणे सकारात्मक राहिले नाही.
ब्रेंट क्रूडचा भाव 1.60 टक्क्यांनी घसरून 114.8 डॉलर प्रति बॅरल झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी भारतीय शेअर्समध्ये 887.65 कोटी रुपयांची खरेदी केली होती.





