“… तरीही केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाही,” काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Sandeep Dikshit Claim On Arvind Kejriwal | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने तयारीला सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. आम आदमी पक्ष हा काँग्रेसबरोबर युती न करता स्वबळावर लढणार आहे. यावरून इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनेही केजरिवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
संदीप दिक्षीत यांचा दावा
काँग्रेस नेते संदीप दिक्षीत यांनी अरविंद केजरीवाल यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेही बोलताना संदीप दिक्षीत म्हणाले की, ” सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना आम्ही तुम्हाला जामीन देऊ, परंतु तुम्ही कोणत्याही शासकीय फायलींवर स्वाक्षरी करू शकत नाही, असं बजावलं आहे. त्यामुळे त्यांना परत मुख्यमंत्री करता येणार नाही,” असे ते म्हणाले.
“दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष जिंकला तरी ते मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले तरी ते कोणतंही काम करू शकणार नाहीत. ते शासकीय दस्तावेजांवर सही करू शकणार नाहीत, त्यांनी तसा प्रयत्न केला तर तो न्यायालयाचा अपमान होईल. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागेल,” असे स्पष्ट विधान संदीप दिक्षीत यांनी केले. Sandeep Dikshit Claim On Arvind Kejriwal |
दरम्यान, नवी दिल्लीतून काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. ते दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत यांचे सुपूत्रही आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या जागेवर आमदार आहेत. Sandeep Dikshit Claim On Arvind Kejriwal |
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी या जागेवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ते या जागेवरून सतत आमदार आहेत. यावेळी संदीप आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेण्यास सक्षम आहे का, हे पाहावे लागेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, ते फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





