“अजूनही चालायला आणि बोलायला त्रास, आरोग्यासाठी प्रार्थना करा”; भावाने दिली विनोद कांबळींची हेल्थ अपटेड

Vinod Kambli Health Update | भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी विनोद कांबळीच्या तब्येती संदर्भातील एक व्हिडिओ समोर आल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. या व्हिडिओमध्ये विनोद कांबळीला आपल्या पायावर उभंही राहता येत नव्हतं आणि त्याला लोकांनी आधार दिला होता.
त्यानंतर यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले. मात्र आता विनोद कांबळी यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे ठिक नसल्याचं त्यांचे भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी सांगितलं आहे. विनोद कांबळी यांच्या स्थितीबद्दल त्यांचा धाकटा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी चाहत्यांना विनोदच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
‘तो एक चॅम्पियन आहे आणि पुनरागमन करेल’
वीरेंद्र कांबळी यांनी एका शोमध्ये सांगितलं की, “विनोद सध्या घरी आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्याच्यावर उपचार अजूनही सुरू आहेत. त्याला बोलताना त्रास होत आहे आणि नीट चालतही येत नाहीत. विनोद १० दिवसांसाठी पुनर्वसन केंद्रात होते, जिथे त्यांची ब्रेन आणि यूरिन टेस्टसह संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली. टेस्ट रिपोर्ट चांगले आहेत आणि फार समस्याही नाहीत. तो चालू शकत नसल्याने त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देण्यात आला.”
पुढे ते म्हणाले, “विनोदला बरं होण्यासाठी वेळ लागेल, पण तो एक चॅम्पियन आहे आणि पुनरागमन करेल, अशी खात्री आहे. तो पुन्हा पूर्वीसारखा चालायला सुरूवात करेल, अशी आशा आहे. मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आशा आहे की तुम्ही त्याला पुन्हा मैदानावर पाहाल. विनोदला अजूनही स्पष्ट बोलता येत नाही. मी चाहत्यांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा. त्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे,” असे आवाहन वीरेंद्र यांनी चाहत्यांना केले. Vinod Kambli Health Update |
हेही वाचा :





