भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीची ( Virat Kohli ) गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. यामुळेच जगातील प्रत्येक व्यक्ती विराटची खूप प्रशंसा करतो. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही विराट कोहलीची खूपच प्रशंसा केली आहे.
#AUSvsENG । टी-२० विश्वविजेत्यांना वनडे सामन्यात कांगारूंनी चारली धूळ
विराट कोहलीने ( Virat Kohli ) आत्ताच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. टी-20 विश्वचषकात भारताच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावांची खेळी केली होती. कोहलीच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाने तो सामना जिंकला होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या दलदलीत फसत असताना कोहलीने डाव फिरवला आणि टीम इंडियाला सामना जिंकून दिला. या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहलीने 4 अर्धशतकांसह सर्वाधिक 296 धावा केल्या.
एकेकाळी विराट कोहली ( Virat Kohli ) आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात खूप तुलना होत असायची. दोन्ही दिग्गज फलंदाज त्यावेळी जबरदस्त लयीत असून भरपूर धावा करत होते. विराट आणि स्मिथ त्यांच्यात एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा होती. मात्र, काही काळापासून स्टीव्ह स्मिथचा फॉर्म पूर्वीसारखा राहिलेला नाही. याच कारणामुळे विराट कोहली त्याच्यापेक्षा खूप पुढे गेला आहे.
स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीबाबत ( Virat Kohli ) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो एका व्हिडिओमध्ये बोलताना म्हणाला की, “विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याने खूप धावा केल्या असून तो एक जबरदस्त खेळाडू आहे.” स्टीव्ह स्मिथची यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा अत्यंत निराशाजनक राहिली. मात्र त्याने गुरुवारी झालेल्या इंग्लंविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार फलंदाजी केली. या सामन्यात स्मिथने 80 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.