Satara | वाईतील भटकी, पिसाळलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

वाई, (प्रतिनिधी) – वाई नगरपरिषद हध्दीतील भटकी कुत्री, जखमी पिसाळलेल्या कुत्री यांना पकडून त्यांचेवर निर्बीजीकरण करण्याची माेहीम वाई नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आली.
वाईत ब-याच मोठया प्रमाणात भटकी कुत्री फिरत असतात व त्यांच्या उपद्रवामुळे नागरीक भयभीत होत असतात. विशेषतः स्त्रिया, लहान मुले व वृध्द नागरी यांना त्यापासून जास्त भय वाटते. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी झाली होती.
त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या माध्यमातून वाई नगरपरिषद हध्दीतील भटकी कुत्री यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया, रेबिज लसीकरण करण्याची मोहीम हाती घेवून जॅनिस स्मिथ वेलफेअर ट्रस्ट, पांचगणी यांना कार्यादेश दिलेला आहे.
त्याप्रमाणे पहिल्या टप्यात १३ भटकी कुत्री पकडून त्यांचेवर निर्बीजीकरण करुन, रेबिज लसीकरण करुन त्यांना सोडण्यात आलेले आहे. तसेच शनिवारी २५ भटकी कुत्री पकडून त्यांचेवर निर्बीजीकरण करुन, रेबिज लस टोचण्यात असली.
या भटकी कुत्री निर्बीजीकरण समितीमधील सदस्य भवरलाल ओसवाल, स्वप्नील भिलारे, विश्वास पवार, सतीश कर्णे या सदस्यांचे नियंत्रण व देखरेखीखाली भटकी कुत्री पकडून नेण्याचे काम करण्यात आले आहे. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी योगेश गाडे, उमेश कांबळे, महेश लाड, परेश लाड, सागर लाड इत्यांदी कर्मचारी भटकी कुत्री पकडण्यासाठी मदत केली.





