युवा साखळी फुटबॉल स्पर्धा; स्टेपओव्हर अकादमीची विजयी घोडदौड

 पुणे: स्टेपओव्हर अकादमीने शानदार विजय मिळवित हॉटफूट स्पोर्टस्‌ अकादमी आयोजित युवा साखळी फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेच्या 10 वर्षाखालील गटात अपराजित्व राखले. हॉटफुट अकादमीच्या कोरेगाव पार्क येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्टेप ओव्हर संघाने मेगा प्रो अकादमीचा 7-2 असा पराभव केला.

यामध्ये प्रामुख्याने वाटा अयांश मुलायिल याने केलेल्या 5 गोलांचा होता. आर्यन भोसले याने 2 गोल करून त्याला चांगली साथ दिली. दुसऱ्या साखळी सामन्यात मात्र मेगा संघाने अमन सेतू संघाचा 8-0 असा धुव्वा उडविला. त्याचे श्रेय विदीत तापडीयाने केलेल्या पाच गोलांना द्यावे लागेल. नाझ अकादमी, स्टार अकादमी आणि फोर लायन्स्‌ अकादमी या संघानी सलग दोन विजय नोंदवित बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. 12 वर्षाखालील गटात फोर लायन्स्‌, अरेना स्पोर्टस्‌ “अ” आणि स्टार अकादमी या संघांनी सलग दोन विजयांची कामगिरी केली.

साखळी फेरीचे निकालः 10 वर्षाखालील गट- अरेना स्पोर्टस्‌ 2 (कुणाल कांबळे 2) वि.वि. इएनएनएस बोर्डींग- 1 (शंभु राजे). हॉटफुट अकादमीः 4 (ऍडम इखमीर 2, विवान चरनानी, आदित पर्लेचा) वि.वि. फोर लायन्स्‌ अकादमी -2 (प्रथम शुभम, तारणवील सिंग). नाझ अकादमी- 4 (झिदान शेख 3, राघव फडणवीस) वि.वि. अरेना स्पोर्टस्‌ 0. हॉटफुट अकादमी – 3 (उस्मान फर्निचरवाला 2, आदित पर्लेचा) वि.वि. इएनएनएस बोर्डींग 0. नाझ अकादमी- 1 (अर्णव ठाकरे) बरोबरी वि. फोर लायन्स्‌ 1 (झिदान शेख). स्टार अकादमी- 3 (धनंजय देसाई, अहान सरकार, सिध्दार्थकुमार) वि.वि. स्टेप ओव्हर 2 (अयांश मुळे). 12 वर्षाखालील मुले- नाझ अकादमी- 4 (यमन सय्यद 3, श्रीराज नायर) वि.वि. एनव्हिक्‍टस स्पोर्टस्‌ 2 (सिध्दांश जोशी, साईराज पांड्ये). स्टार अकादमी- 8 (आरूश जैन 2, आदि शिंदे, रातुल खेर 2, तनिष्क जेह 2, अमोघ मेशराम) वि.वि. अमन सेतू स्कूल 0.

Leave A Reply

Your email address will not be published.