State Ranking Table Tennis Tournament 2024 : तनिषा, कुशल यांना विजेतेपद…

संभाजीनगर – नाशिकच्या तनिषा कोटेचा व कुशल चोपडा यांनी अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या १९ वर्षांखालील अनुक्रमे मुलींच्या व मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या मुलींच्या १९ वर्षांखालील गटातच्या अंतिम फेरीत १६ व्या मानांकित तनिषा कोटेचाने टीएसटी मुंबईच्या हार्दी पटेलला ११-५,७-११,११-८,७-११,११-४, ११-६ असे संघर्षपूर्ण पराभूत केले. त्यापूर्वी तनिषाने उपांत्य फेरीत १३ व्या मानांकित रिशा मिरचंदानीचे तर हार्दी पटेलने सुक्राती शर्माचे आव्हान मोडून काढताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
मुलांच्या गटातून कुशल चोपडाने पाचव्या मानांकित मुंबई महानगरच्या सिद्धांत देशपांडेला ८-११,११-७,११-४,११-४,११-५ असे पराभूत करताना विजेतेपदाला वग्सनी घातली. कुशल चोपडाने उपांत्य फेरीत पुण्याच्या नील मुळ्येला तर सिद्धांत देशपांडेने सातव्या मानांकित टीएसटी मुंबईच्य ध्रुव शाहला पराभूत करताना अंतिम फेरी गाठली होती.
State Ranking Table Tennis Tournament 2024 : नैशा रेवसकरला दुहेरी मुकुट..
पाटकर – सिद्धेश ठरले अव्वल
टीएसटी मुंबईच्या मधुरिमा पाटकरने ठाण्याच्या आर्या सोनगडकरला ११-८,९-११,११-५,११-४, ५-११,११-७ असे पराभूत करून महिला गटाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुष गटातून सहाव्या मानांकित ठाण्याच्या सिद्धेश पांडेने अग्रमानांकित रीगान अलबुकर्कला ११-९,११-८,११-५,९-११,९-११, १०-१२, १३-११ असे पराभूत करताना विजेतेपद मिळविले.



