Pimpri | आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर

पिंपरी,- जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलनमधील अत्याधुनिक हाय-टेक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स रुग्णसेवेत दाखल झाले आहे. या अत्याधुनिक सुविधेचे उद्घाटन आदित्य बिर्ला फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला व आदित्य ग्रुपच्या संचालक के.के. महेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी राजश्री बिर्ला म्हणाल्या की, या अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल आरोग्यसेवेत उत्कृष्टता साध्य करण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते. अशा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज होऊन आम्ही समाजाला सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्यास सक्षम होऊ.
नवीन सहा ऑपरेशन थिएटरच्या समावेशामुळे आता आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एकूण 15 ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहेत. ही सुविधा प्रगत शस्त्रक्रिया प्रक्रियांसाठी वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे रूग्णांना वेळेवर आणि उत्तम दर्जाच्या शस्त्रक्रिया सेवा मिळतील.
हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पामेश गुप्ता म्हणाले की सहा नवीन ऑपरेशन थिएटर च्या समावेशामुळे, ऑपरेशन थिएटरची संख्या आता 15 झाली आहे, ज्यामुळे आमचे हॉस्पिटल विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी अधिक सज्ज झाले आहे. ही सुविधा आमच्या डॉक्टरांना जटील शस्त्रक्रिया अचूकतेने करण्यास सक्षम करते आणि उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेचे आमचे ध्येय बळकट करते.




