satara | अश्वमेध ग्रंथालयाचे राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा, (प्रतिनिधी) – येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे कै. भास्करराव माने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाणारे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार 2023 जाहीर करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक डॉ. रविंद्र झुटींग-भारती व अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.
या पुरस्कारांमध्ये कांदबरी विभागात डॉ. श्रीकांत पाटील यांच्या ‘कडेलूट’ व लेखक बाळासाहेब लबडे यांच्या ‘काळ’ या कांदबर्यांना अक्षर गौरव साहित्य पुरस्कार 2500 रुपये व स्मृतीचिन्ह तसेच कथासंग्रह विभागात लेखक महादेव माने यांच्या ‘वसप’, कुणब्याची पोरं – कथासंग्रह लेखक आप्पासाहेब खोत,
भैरवायन – कादंबरी लेखिका नीलम माणगावे, सवळा – कादंबरी लेखक विठ्ठल खिलारी, तसेच कवितासंग्रह प्रकाश पेरणी -कवी – सुभाष कवडे, वसुंधरेचे शोधयात्री -संकीर्ण लेखक डॉ अनुराग लव्हेकर यांना अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार स्वरूप 1000 रुपये व स्मृतीचिन्ह जाहीर झाला आहे.
महाराष्ट्राचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ – चरित्र लेखक अमर शेंडे, दिडदा दिडदा – कवितासंग्रह कवी डॉ. अदिती काळमेख, उजळपरी – कादंबरी बाल वाङमय लेखिका सावित्री जगदाळे, सु -मनांचे रेखां – ‘कण’ – कवितासंग्रह कवी रेखा विजय शिर्के तसेच गोष्टी लतादीदीच्या – बाल वांङमय लेखक पद्माकर पाठकजी,
डॉ. श्रीकांत कारखानीस अक्षर गौरव साहित्य गौरव पुरस्कार ( आरोग्य विषयक ग्रंथासाठी ) आयुर अग्नी – आरोग्यविषयक लेखक डॉ आनंद ओक व डॉ सुप्रिया ओक यांना अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार स्वरूप 1000 रुपये व स्मृतीचिन्ह जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते सातारा येथे संपन्न होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.





