Maharashtra State Govt Decision : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीर महायुती सरकारने राज्यात निर्णयांचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मोठे निर्णय युती सरकारने घेतले आहे. आता आर्थिक स्थिरता आणण्याच्या हेतूने राज्य सरकारने मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापना करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापना करण्यास मंजुरी मिळाली आहे. ‘MAHA ARC LIMITED’ असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी राज्य शासनाच्या मालमत्ता, गुंतवणूक, आणि आर्थिक साधनांचा पुनर्वापर आणि पुनर्रचना करण्याचे काम करणार आहे. या कंपनीची स्थापना करण्यामागचा हेतू म्हणजे अनेक मालमत्ता आणि आर्थिक साधनं निष्क्रिय आहेत किंवा त्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो, त्यामुळे या संसाधनांवरून अपेक्षित परतावा सरकारला मिळत नाही. याचे सुनियोजन करण्याचे काम यामार्फत करण्यात येणार आहे. राज्याच्या मालमत्तेचा अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी ही कंपनी मध्यस्थी आणि व्यवस्थापन करणार आहे. ही कंपनी नेमकं काय करणार? राज्याची मालमत्ता व्यवस्थित, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित करणार निष्क्रिय किंवा अकार्यक्षम मालमत्तांचा आर्थिक पुनर्वापर करणार शासनाच्या कर्ज आणि देणींचे संतुलन साधणार राज्याच्या मालमत्तांचा उपयोग वाढणार, सोबतच निष्क्रिय संपत्ती आर्थिकदृष्ट्या सक्रिय होईल नवीन निधी उभारणीस मदत होणार, सोबतच सरकारला भांडवली बाजारातून पैसा उभारता येणार कर्ज व्यवस्थापन सुधारणार आणि जुन्या कर्जांचे पुनर्विलोकन करून वित्तीय ताण कमी करता येणार सरकारला अप्रत्यक्षरीत्या अधिक महसूल मिळू शकतो, ज्यात राजस्व वाढण्यास मदत हेही वाचा : Javed Akhtar: ‘लाजेनं माझी मान खाली झुकली’ – भारतात तालिबानी परराष्ट्र मंत्र्याच्या स्वागतावर जावेद अख्तर संतापले