Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारकडून ‘या’ बड्या वकिलाची नियुक्ती; कोण आहे वाचा….
ज्येष्ठ वकील अजय मिसर हे गुंतागुंतीच्या आणि उच्चप्रोफाइल गुन्हेगारी खटल्यांमध्ये अनुभवी नाव मानले जाते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधातील महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संवेदनशील आणि चर्चित प्रकरणासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधीज्ञ ‘अजय मिसर’ यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.
गंभीर स्वरूपाचे आरोप, वाढती तक्रारींची संख्या आणि समाजात निर्माण झालेली तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन सरकारने अनुभवी कायदेपंडिताची निवड केल्याचे मानले जात आहे. या नियुक्तीमुळे प्रकरणाची कायदेशीर बाजू अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मिळत आहेत. Ashok Kharat
कोण आहेत ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर? Ashok Kharat
ज्येष्ठ वकील अजय मिसर हे गुंतागुंतीच्या आणि उच्चप्रोफाइल गुन्हेगारी खटल्यांमध्ये अनुभवी नाव मानले जाते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे.
2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, 2011 मधील दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले रवी पुजारी प्रकरण तसेच नाशिकमधील बहुचर्चित धान्य घोटाळा प्रकरण.
या प्रकरणांमध्ये त्यांनी सरकारी बाजू मजबूतपणे मांडत न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे खरात प्रकरणातही न्यायालयीन लढाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Ashok Kharat
आज न्यायालयात हजर करणार : Ashok Kharat
अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून कोठडी वाढवण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तपासासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे कारण पुढे केले जाऊ शकते.







