Profit Of State Bank : स्टेट बँकेच्या नफ्यात विक्रमी वाढ
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (Profit Of State Bank) तिसर्या तिमाहीतील स्टॅन्ड अलोन नफ्यात विक्रमी वाढ होऊन हा नफा 21,028 कोटी रुपये इतका झाला आहे. या कालावधीत स्टेट बँक समूहाचा नफा 13 टक्क्याने वाढून 21,317 कोटी रुपये झाला आहे.

Profit Of State Bank : सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (Profit Of State Bank) तिसर्या तिमाहीतील स्टॅन्ड अलोन नफ्यात विक्रमी वाढ होऊन हा नफा 21,028 कोटी रुपये इतका झाला आहे. या कालावधीत स्टेट बँक समूहाचा नफा 13 टक्क्याने वाढून 21,317 कोटी रुपये झाला आहे.
बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार बँकेचे व्याजातील उत्पन्न 9 टक्क्यांनी वाढून 45,190 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 41,446 कोटी रुपये इतकी होती. या तिमाहीत बँकेने केलेला कर्ज पुरवठा 15.14 टक्क्यांनी वाढला आहे. बिगर व्याज उत्पन्न 15.65 टक्क्यांनी वाढून 8,404 कोटी रुपये झाले आहे. या तिमाहीत बँकेच्या ठेवी 9 टक्क्यांनी वाढल्या असल्याचे बँकेने म्हटले आहे.
गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 1.73% होती. ती यावर्षी या तिमाहीत 1.57% वर आली आहे. तर बँकेला अनुत्पादक कर्जापोटी 4,507 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. एसबीआय म्युच्युअल फंडाने विशेष 2,200 कोटी रुपयांचा लाभांश दिल्यामुळे बँकेच्या नफ्यात या तिमाहीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत झाली असे स्टेट बँकेचे अध्यक्ष सी एस शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळातही बँकेचा ताळेबंद नफादायक राहण्याची शक्यता आहे.





