स्टेट बँक आपल्या उपकंपन्या विकणार? एसबीआयचे अध्यक्ष नेमकं काय म्हणाले, पाहा…

State Bank – स्टेट बँकेने आपल्या एसबीआय जनरल ईन्शुरन्स आणि एसबीआय पेमेंट अशा कंपन्या विकण्याचा पावले टाकायला सुरूवात केली असल्याचे वृत्त आहे. तथापि आम्ही या उपकंपन्यांचा व्यवसाय वाढण्याची वाट पाहू आणि त्यानंतर या कंपन्यांचे मॉनिटायझेशन करू असे एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की या उपकंपन्यांचा व्यवसाय विस्तारला की त्यांचे मूल्यांकन वाढेल आणि त्यांच्या विक्रीतून एसबीआयला चांगला परतावा मिळेल. उपकंपन्यांचा विचार केला तर त्यांची कमाई भांडवली बाजारातून होईल, असे त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ते म्हणाले की या कंपन्यांचा विस्तार वाढला तर आम्ही या कंपन्यांमधील आमची होल्डिंग कमाई करण्यासाठी भांडवली बाजारात जाण्याचा विचार करू. परंतु चालू आर्थिक वर्षात हे होण्याची शक्यता नाही असेही त्यांनी नमूद केले.
एसबीआय जनरल इन्शुरन्सने मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात ३०.४ टक्के वाढ नोंदवून तो रु. २४० कोटींवर पोहोचला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नॉन-लाइफ सब्सिडियरीने मागील आर्थिक वर्षात १८४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. एसबीआय पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या एसबीआयच्या उपकंपनीचा नफा मात्र यंदा काही प्रमाणात घटला आहे.





