Nagar | वाडिया पार्फ जलतरण तलाव सुरु करा

नगर, (प्रतिनिधी) – वाडिया पार्क जलतरण तलाव सुरू करण्याबाबत प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्विमिंग सदस्य अनिल रामदासी, नितीन घोडके, सचिन पवार, प्रसाद जोशी, विकास पांडे, प्रमोद विश्वकर्मा आदी उपस्थित होते.
जलतरण तलाव गेली ६ वर्षांपासून नागरिकांसाठी चालू होता परंतू गेली आठ दिवसांपासून जलतरण तलाव ठेकेदाराने अचानक बंद केला आहे. जलतरण तलावात ज्येष्ठ नागरिक तसेच अनेक खेळाडू, शुगर, बी. पी. चे पेशंट यांचा लाभ घेतात.
या तलावाच्या माध्यमातून अनेक जलतरण खेळाडू तयार झाले आहेत. ठेकेदार कंपनीने जलतरण तलाव अचानक बंद केल्याने खेळाडू व नागरिक हे जलतरणापासून वंचित झाले आहेत. तरी तलावाचे रिटेंडर करून जलतरण तलाव पुन्हा सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा फुलसौंदर यांनी दिला आहे.





