पुरी येथील जगन्नाथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; तब्बल ६०० भाविक जखमी

Jagannath Rath Yatra | ओडिशात पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. मात्र प्रचंड जनसमुदायामुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत 600 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढण्यात गोंधळ निर्माण झाला. रथयात्रेच्या मार्गावरील एका वळणावर रथ ओढण्यात खूप अडचण आली. रथ ओढणे थांबल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक एकाच ठिकाणी जमा झाले. यामुळे रथाच्या सुरळीत हालचालीत मोठा अडथळा निर्माण झाला. गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने अनेक आव्हाने निर्माण झाली.
या गोंधळामुळे मोठ्या संख्येने भाविक अस्वस्थ झाले, ज्यामुळे काही लोक चेंगरून बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीनं अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर पुरी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.
#WATCH | Puri, Odisha | Ambulances reached the Rath Yatra spot after some people complained of suffocation and were reported unconscious due to humidity.
The affected people were taken to the hospital and were provided with the required medical assistance https://t.co/Fie3j5sA03 pic.twitter.com/JYIkSUi7jj
— ANI (@ANI) June 27, 2025
;
याबाबत ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी सांगितले की, “दमट हवेमुळं अनेकांना गुदमरल्यासारखे झाले, त्यामुळं ते बेशुद्ध झाले. मात्र त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंदिराच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लोकांना पुरेशा प्रमाणात ग्लुकोज आणि पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली जात आहे. पुरेशी वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी मी स्वतः आलो आहे. रुग्णालयात जाऊनही भेट देणार आहे,” अशी माहिती मुकेश महालिंग यांनी दिली आहे. Jagannath Rath Yatra |
2024 मध्ये चेंगराचेंगरीची घटना
याआधी 2024 मध्येही पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. गेल्या वर्षी भगवान जगन्नाथाचा रथ पुरीच्या ग्रँड रोडवरून जात असताना ही घडली होती. ज्यात एका भाविकाचा जीव गेला होता. त्यादृष्टीने यंदा प्रशासनाने कडक पावले उचलण्यात आली होती, मात्र मोठ्या जनसमुदायामुळे यंदाही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. Jagannath Rath Yatra |
हेही वाचा:
Pune : अधिकारी, कर्मचारी गेले कोठे? क्षेत्रीय कार्यालयात रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन





