एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा; महागाई भत्त्यासंदर्भात प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा

Pratap Sarnaik | राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भातील मागणीवर याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला माणगाव येथे सुरुवात झाली. यावेळी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भातील मागणीवर याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. Pratap Sarnaik |
महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्के करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय एसटीच्या ताफ्यात दरवर्षी 5 हजार याप्रमाणे 5 वर्षात 25 हजार नवीन लालपरी बसेस दाखल होतील, अशीही माहिती सरनाईक यांनी दिली. Pratap Sarnaik |
एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के मिळाले होते वेतन
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.
या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांवरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली होती.
हेही वाचा:
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी पुतण्या म्हणून…; रोहित विधान चर्चेत





