ट्रकच्या धडकेत एसटीचा चेंदामेंदा ! कोल्हापुरातील भीषण अपघातात, ड्रायव्हर ठार, 15 जखमी
Updated On:

कोल्हापूर – येथे मंगळवारी एसटी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बस ड्रायव्हरचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. टक आणि बसचा अपघात एवढा भीषण होता की, बसचा पुढील भाग चेंदामेंदा झाला असून ट्रकच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा बसच्या मेन्टेनन्स आणि खराब बसच्या वाहतुकीचा मुद्दा समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसापासून बेळगाव वेंगुर्ला रस्ताच्या रुंदीकरण रखडलं आहे. त्यामुळे, येथे अपघाताच्या घटना घडत आहेत.
कोल्हापूरच्या चंदगडमध्ये बेळगाव -वेंगुर्ला मार्गांवर ट्रक व बसचा भीषण अपघात झाला. दरम्यान, रस्ता अरुंद असल्याने वाहनांना जाताना-येताना अडचण निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे





