Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी शोककळा! SRPF दौंडचे समादेशक तुषार पाटील यांचे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी निधन
Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलातील एक अत्यंत कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि तडफदार अधिकारी अशी ओळख असलेले राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF गट क्रमांक ५, दौंड) समादेशक तथा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी निधन झाले.

Maharashtra Police : राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक 5, दौंडचे समादेशक तथा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा पसरली असून सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Police)
काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने तुषार पाटील यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. (Maharashtra Police)
तुषार पाटील यांच्या मृत्यूचं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी किडनी दान करून त्यांना नवजीवन दिले होते. अलीकडे पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Maharashtra Police)
तुषार पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. कोल्हापूर येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची एसआरपीएफ गट-5, दौंड येथे समादेशक तथा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. (Maharashtra Police)
वाहतूक विभागातील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या
यापूर्वी त्यांनी कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबई येथे पोलीस अधीक्षक तसेच वाहतूक विभागातील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे लोहमार्ग पोलीस दलातही उल्लेखनीय सेवा बजावली होती. (Maharashtra Police)
कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख
कर्तव्यदक्ष आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलाने एक अनुभवी आणि सक्षम अधिकारी गमावला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Police)





