Satara | चोराडे येथील श्रीराज केसरी मैदान उत्साहात

पुसेसावळी, म्हासुर्णे, (प्रतिनिधी)- खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्रीराज डेअरीच्या वर्धापन दिनानिमित्त “श्रीराज केसरी”च भव्य दिव्य ‘एक आदत, एक बैल’ शर्यतीचे मैदान झाले, यामध्ये रीतसर तीन फेरे पळून एक क्रमांकाचा मानकरी ठरला तो गणेशा व छोटा सोन्या.
तर दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राजा व स्वराज,तीन क्रमांकाचा मानकरी विठ्ठल व मेहबूब, लक्ष्या व मथुर चौथ्या क्रमांकाचे तर पाचव्या क्रमांकाचा मानकरी अरमान व चिक्या,
सहा क्रमांकाचा मानकरी तुफान व शास्त्री, सात क्रमांकाचा मानकरी म्हलार व प्रधान, उत्तेजनार्थ आठ क्रमांकाचा मानकरी आदत किंग शंभू असे मैदानाचे मानकरी ठरले.
तसेच उपांत्यापूर्व फेऱ्यामध्ये आठ बैलगाड्या विजयी ठरल्या. तसेच अभिजित पिसाळ फौजी यांच्याकडून विजयी बैलगाडींना ढाली देण्यात आल्या.
यावेळी राजवर्धन कदम, श्रीकांत पिसाळ(आप्पा), पैलवान तुषार माने, अनिल पिसाळ (आप्पा), बापूराव पिसाळ ( ड्रायव्हर), माजी.चेअरमन विजय पिसाळ, पृथ्वीराज जाधव, उपसरपंच बबन माळी, जगन्नाथ पाटील, बापू थोरवे, आण्णासो माने,
माजी सरपंच सुरेश पाटील, चेअरमन रामचंद्र माने, पैलवान युवराज पिसाळ, गोविंद शेठ पिसाळ, प्रतिक पिसाळ, माजी चेअरमन सतीश पिसाळ, उमेश पिसाळ, विलास पाटील,
चंद्रकांत पिसाळ, नंदकुमार पिसाळ, प्रशांत पिसाळ, अशोक पाटील आदींसह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या बैलगाडा शर्यतीचे आयोजन अभिजित पिसाळ फौजी व सचिन पिसाळ फौजी, रामदास पिसाळ फौजी यांच्या नियोजनाखाली हे मैदान पार पडले,
या मैदानाचे समालोचन सुनील मोरे यांनी केले, तर झेंडा पंच आसिफ मुलाणी, सोमनाथ जगदाळे तसेच निकाली पंच अभिजित पिसाळ फौजी, बबन माळी, दत्तात्रय साळुंखे, पैलवान शांताराम पिसाळ, तानाजी पिसाळ यांनी पार पाडले, या बैलगाडा शर्यतीस फिरोज मुल्ला, आण्णासो पिसाळ, संकेत पिसाळ, रोहित शिंगाडे, शशिकांत पिसाळ,
पैलवान विजय पिसाळ, अतुल कोळी, तात्यासो पिसाळ, ओम पिसाळ, अक्षय पिसाळ, शरद पिसाळ, उमेश पिसाळ, नवनाथ पिसाळ, नितीन कुलकर्णी, अनिकेत पिसाळ, धनाजी पिसाळ, धनाजी पवार, अमोल पिसाळ, आप्पासो पिसाळ, सागर पिसाळ,
बबलू घार्गे, संभाजी पिसाळ, अक्षय घाडगे, अभिजित पिसाळ, संकेत लोकरे, आदिनी मोलाचे सहकार्य केले. बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी परिसरातील हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व बैलगाडा शौकीन उपस्थित होते.




