जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू

अनंतनाग – जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डाकसुममध्ये शनिवारी एक भीषण रस्ते अपघात झाला. येथे एक कार रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली. या अपघातात पाच मुलांसह एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला.
अपघातात ठार झालेले सर्व लोक किश्तवाडचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब किश्तवाडहून सिंथान टॉप मार्गे मारवाहच्या दिशेने जात होते. त्यानंतर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.
अपघातात मृत्यू पावलेल्यांपैकी इम्तियाज हे पोलीस कर्मचारी होते. यासोबतच कारमध्ये पाच मुले आणि दोन महिलांचा समावेश होता. या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये इम्तियाज आणि त्यांची पत्नी अफरोजा अशी पती-पत्नीची नावे आहेत.
इम्तियाज राथेर (रा. किश्तावार, वय 45 ) अफरोजा बेगम (वय ४०), रेश्मा अहमद (वय ४० ), अरीबा इम्तियाज अहमद(वय १२ ), अनिया जान अहमद (वय 10 वर्षे), अबान इम्तियाज (वय ६), मुसैब माजिद अहमद (वय 16), मुशाइल माजिद (वय 8 ) अशी मृतांची नावे आहेत.




