SL vs ZIM : आशिया कपपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! झिम्बाब्वेने अवघ्या ८० धावांत गुंडाळत उडवला धुव्वा

टी-20 क्रिकेटमधील श्रीलंकेची नीचांकी धावसंख्या –
टी-20 क्रिकेटमधील श्रीलंकेची सर्वात नीचांकी धावसंख्या 77 धावांची आहे, जी त्यांनी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवली होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी 80 धावा केल्या, जी त्यांच्या टी-20 इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली आहे. याशिवाय, त्यांची तिसरी नीचांकी धावसंख्या 82 धावांची आहे, जी 2016 मध्ये भारताविरुद्ध नोंदवली गेली होती.
श्रीलंकेच्या फलंदाजांचे निराशाजनक प्रदर्शन –
Zimbabwe defeated Sri Lanka in the 2nd T20I…🤯🇱🇰 #slvszim pic.twitter.com/UAIMbrf3Rk
— TrollKaTaj | Memes • Polls • IPL (@trollkataj) September 6, 2025
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कामिल मिशारा ठरला, ज्याने 20 चेंडूंमध्ये 20 धावा केल्या. याशिवाय कर्णधार चरिथ असलंका आणि दसुन शनाका हे एकमेव दोन फलंदाज होते ज्यांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र, दोघांनीही संथ फलंदाजी केली. असलंका याने 23 चेंडूंमध्ये 18 धावा, तर शनाका याने 21 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांमध्ये केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले.
हेही वाचा – Asia Cup 2025 : टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का? शिवम दुबेने शेअर केले फोटो
झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय –
प्रत्युत्तरात 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वे संघाने 14.2 षटकांमध्ये 5 गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. ताशिंगा मुसेकिवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, ज्याने 14 चेंडूंमध्ये 21 धावा केल्या. सलामीवीर तदिवानाशे मारुमानी याने 12 चेंडूंमध्ये 17 धावा जोडल्या. या विजयासह तीन सामन्यांची ही मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 7 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.





