Sri Lanka : श्रीलंकेला आशा कर्जाच्या फेरनियोजनाची

Sri Lanka – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतीच श्रीलंकेला दिलेली भेट आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोखे धारकांसह कर्जाची पुनर्रचना समाप्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण होती, असे श्रीलंकेने मंगळवारी सांगितले.
दिनांक २३ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्ष म्हणून अनुरा कुमारा दिसानायके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जयशंकर हे श्रीलंकेला भेट देणारे पहिले परदेशी नेते होते. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी जयशंकर यांनी दिवसभराचा श्रीलंका दौरा केला होता.
भारताने द्विपक्षीय कर्जदार म्हणून करारासाठी स्वाक्षरी केल्याने हा करार कर्जाच्या पुनर्रचनेतील तुलनात्मक कार्यपद्धतीच्या तत्त्वाशी सुसंगत आहे, असे मंत्रिमंडळाच्या प्रवक्त्या आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री विजिथा हेरथ यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
जवळपास १७.५ अब्ज डॉलरच्या विदेशी व्यवसायिक कर्जाचे फेरनियोजन करण्यासाठीच्या करार करण्याचे तत्वतः निश्चित झाल्याचे अध्यक्षीय निवडणुकीपुर्वीच श्रीलंकेने म्हटले होते.





