Sri Lanka Cricket : एसएलसीचा मोठा निर्णय, ‘या’ दिग्गज खेळाडूवर सोपविली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी…

Sanath Jayasuriya : श्रीलंका क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सनथ जयसूर्याला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. जयसूर्या काही काळ संघासोबत होता, पण तो अंतरिम प्रशिक्षक म्हणून रुजू झाला होता. मात्र, त्याच्या नियुक्तीनंतर संघाच्या उत्कृष्ट कामगिरीने खूश होऊन श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला कायमस्वरूपी जबाबदारी दिली आहे. श्रीलंका क्रिकेटने सोशल मीडियावर पोस्ट करून याची पुष्टी केली आहे.
श्रीलंका क्रिकेटने लिहिले आहे की, “सनथ जयसूर्या यांची राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील संघाची चांगली कामगिरी लक्षात घेऊन श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने हा निर्णय घेतला. या सर्व मालिकेत अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून जयसूर्याची जबाबदारी होती. पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षकपदाची नियुक्ती 1 ऑक्टोबर 2024 रोजी लागू होईल आणि 31 मार्च 2026 पर्यंत असेल.”
Sri Lanka Cricket wishes to announce the appointment of Sanath Jayasuriya as the head coach of the national team.
The Executive Committee of Sri Lanka Cricket made this decision taking into consideration the team’s good performances in the recent tours against India, England,… pic.twitter.com/IkvAIJgqio
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 7, 2024
श्रीलंकेच्या संघाने प्रशिक्षक म्हणून जयसूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली चमकदार कामगिरी केली आहे. माजी कर्णधाराचा कार्यकाळ भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेपासून सुरू झाला. या मालिकेतील 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीला श्रीलंकेच्या संघानं चकित केले होते. एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेने भारताचा 2-1 असा पराभव केला होता.
IND vs BAN 1st T20 : हार्दिक-सूर्याची दमदार खेळी, टीम इंडियाचा बांगलादेशवर शानदार विजय…
यानंतर, श्रीलंकेचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला, जिथे त्यांनी इतिहास रचला आणि ओव्हलवरील तिसरी कसोटी जिंकली. त्यानंतर श्रीलंकेने न्यूझीलंडला घरच्या मैदानावर पराभूत केले आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. आता पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून जयसूर्याची पहिली जबाबदारी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 ऑक्टोबरपासून सुरू होणारी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेपासून सुरू होईल.





