IND vs SL : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, चरिथ असलंकाला मिळाली मोठी जबाबदारी…

Sri Lanka squad for the India T20I Series : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला फारच कमी वेळ शिल्लक आहे. मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे, त्याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर वानिंदू हसरंगानं कर्णधारपद सोडल्यानंतर या मालिकेसाठी नवा कर्णधार कोण असेल, हेही बोर्डाला ठरवायचं होतं. मंडळानेही याला मान्यता दिली आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया आधीच श्रीलंकेत पोहोचली आहे. त्याचा सरावही लवकरच सुरू होईल.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. दरम्यान, आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी चारिथ असलंकाला नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. माजी कर्णधार दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
बोर्डाने संघात फारसे बदल केलेले नाहीत, मात्र अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. संघाचा माजी कर्णधार आणि अफाट अनुभव असलेला खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, यामागचे कारण काय, हे स्पष्ट झालेले नाही.
Sri Lanka announces the T20I squad for the India series, with Asalanka named as captain. #SLvIND pic.twitter.com/O5oeyFtLHU
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 23, 2024
असलंकाच्या नेतृत्वाखाली लंका प्रीमियर लीगचे पटकावले विजेतेपद…
चरिथ असलंका 2024 च्या टी20 विश्वचषकात संघाचा उपकर्णधार होता. वानिंदू हसरंगाने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच तो संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशी अपेक्षा होती, आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे चरिथ असलंकाच्या नेतृत्वाखाली जाफना किंग्जने अलीकडेच लंका प्रीमियर लीग म्हणजेच LPL चे विजेतेपद पटकावले होते, त्यानंतर तो कर्णधार होण्याची शक्यता अधिक वाढली होती. आता भारताविरुद्ध मैदानात उतरल्यावर संघ कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.
Team India : पांड्याला टी-20 संघाचे कर्णधारपद का मिळाले नाही? मुख्य निवडकर्त्याने केला स्वतः खुलासा…
भारताविरुद्ध श्रीलंकेचा 16 सदस्यीय संघ : चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसंका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांडीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसारंगा, डुनिथ वेलालगे, महीश तीक्ष्णा, चामिंदु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो.





