SRH vs RR Kishan Head : इशान-ट्रॅव्हिसच्या फटकेबाजीने घातला धुमाकूळ, आरसीबीचा महाविक्रम तुटण्यापासून थोडक्यात वाचला

SRH vs RR Sunrisers Hyderabad Becomes Joint Fastest to Score 200 Runs : आयपीएल २०२५ चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे, या सामन्यात एसआरएचच्या फलंदाजांनी धुमाकूळ घातला. नाणेफेक गमावल्यानंतरही, संघाने निर्धारित २० षटकांत २८६ धावा करून अनेक विक्रम मोडले. एसआरएचने फक्त १४.१ षटकांत २०० धावांचा टप्पा गाठला, जो आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेल्या सर्वात जलद २०० धावांचा टप्पा आहे.
इशान किशन झळकावले नाबाद शतक –
एसआरएचपूर्वी, हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर होता, ज्यांनी २०१६ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध तितक्याच चेंडूंमध्ये २०० धावांचा टप्पा गाठला होता.प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु अभिषेक बाद झाल्यानंतर हेडने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. हेड बाद झाल्यानंतर, हैदराबादचा डाव मंदावेल असे वाटत होते, परंतु इशानने जोरदार फलंदाजी केली आणि ४५ चेंडूत शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली.
Vachharu Fire Tho 🔥
Travis Head | Ishan Kishan | #PlayWithFire | #SRHvRR | #TATAIPL2025 pic.twitter.com/Yqk0Iva4R4
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 23, 2025
आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० धावा करणारे संघ :
१४.१ षटके – आरसीबी विरुद्ध पीबीकेएस, २०१६
१४.१ षटक – एसआरएच विरुद्ध आरआर, आज
१४.४ षटके – एसआरएच विरुद्ध एमआय, २०२४
१४.५ षटके – एसआरएच विरुद्ध डीसी, २०२४
इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेडची तुफान फटकेबाजी –
इशान किशनने आयपीएल २०२५ मधील पहिले शतक झळकावत सनरायझर्स हैदराबादला २८६ धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. डावखुऱ्या फलंदाजाने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १०६ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय, ट्रॅव्हिस हेडने ६७ धावांची शानदार खेळी केली.





