SRH vs RR Ishan Kishan : इशान किशनच्या शतकाच्या जोरावर हैदराबादने केला कहर! उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

SRH vs RR Ishan Kishan hits 1st century of IPL 2025 scores in 45 balls : इशान किशनच्या नाबाद शतक आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु इशान आणि हेडच्या बळावर हैदराबादने २० षटकांत सहा गडी गमावून २८६ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही हैदराबादच्या नावावर आहे. गेल्या हंगामात हैदराबादने आरसीबीविरुद्ध तीन विकेटच्या मोबदल्यात २८७ धावा केल्या होत्या, जी या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
इशान किशनने ४५ चेंडूत झळकावले शतक –
प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली, परंतु अभिषेक बाद झाल्यानंतर हेडने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. हेड बाद झाल्यानंतर, हैदराबादचा डाव मंदावेल असे वाटत होते, परंतु इशानने जोरदार फलंदाजी केली आणि ४५ चेंडूत शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली. हा इशानचा सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण सामना होता. ४७ चेंडूत ११ चौकार आणि सहा षटकारांसह १०६ धावा काढल्यानंतर इशान नाबाद परतला.
𝙏𝙝𝙖𝙩 𝙢𝙖𝙞𝙙𝙚𝙣 #TATAIPL 𝙘𝙚𝙣𝙩𝙪𝙧𝙮 𝙛𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜 🧡
A special first for Ishan Kishan as he brought up his 💯 off just 45 balls 🔥
Updates ▶️ https://t.co/ltVZAvInEG#SRHvRR | @SunRisers | @ishankishan51 pic.twitter.com/8n92H58XbK
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
सनरायझर्सकडून हेडने ३१ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ६७ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या, नितीशकुमार रेड्डीने १५ चेंडूत ३० धावा केल्या, अभिषेकने ११ चेंडूत पाच चौकारांसह २४ धावा केल्या आणि अनिकेत वर्माने सात धावा केल्या. राजस्थानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज तुषार देशपांडे होता, ज्याने तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय महेश तिक्ष्नाने दोन आणि संदीप शर्माने एक विकेट्स घेतली.
आयपीएलमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्या :
२८७/३ – एसआरएच विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, २०२४
२८६/६ – एसआरएच विरुद्ध आरआर, हैदराबाद, आज*
२७७/३ – एसआरएच विरुद्ध एमआय, हैदराबाद, २०२४
२७२/७ – केकेआर विरुद्ध डीसी, विशाखापट्टणम, २०२४
२६६/७ – एसआरएच विरुद्ध डीसी, दिल्ली, २०२४
२६३/५ – आरसीबी विरुद्ध पीडब्ल्यूआय, बेंगळुरू, २०१३





