SRH vs PBKS : मैदानातच चेंडू हरवल्यामुळे गोंधळला इशान किशन, नक्की काय घडलं? पाहा VIDEO

SRH vs PBKS Ishan Kishan confused after losing the ball video viral : आयपीएल २०२५ चा २७ वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यजमान सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यरने दमदार फटकेबाजी करत पंजाबला तब्बल २४५ धावांचा डोंगर उभारुन दिला. आता या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चेंडू हरवल्यामुळे इशान किशन गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे.
चेंडू हरवल्यानंतर इशान किशन गोंधळलेला दिसत होता –
Never change, KISHAN! 😅#IPL2025 #SRHvsPBKS #IshanKishanpic.twitter.com/kseJ5GbrBW
— OneCricket (@OneCricketApp) April 12, 2025
सामन्याच्या पहिल्याच षटकात इशान किशनच्या विचित्र क्षेत्ररक्षणाने हैदराबादच्या कर्णधारासह सर्वांनाच हसवले, खरं तर, मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने स्ट्रेटला मारला. यादरम्यान, समोर क्षेत्ररक्षण करणाऱ्या इशान किशनने डायव्ह मारुन चेंडू अडवला.
https://twitter.com/Purplepatch22/status/1911058074158145965
पण चेंडू थांबल्यानंतर तो मैदानावर असलेल्या स्पॉन्सर मॅटवर हरवला. अशा परिस्थितीत, इशान किशन चेंडू शोधण्याच्या प्रयत्नात इकडे तिकडे पाहत राहिला. कारण स्पॉन्सर मॅटवरील रंग आणि चेंडूचा रंग एकच होता. म्हणजे दोन्हीचा रंग पांढरा असल्याने, तो चेंडू इशानच्या शेजारी पडलेला असून त्याला दिसून आला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – LSG vs GT : लखनौने कसा रोखला विजयरथ? शुबमनने सांगितलं खरं कारण
पंजाब किंग्जने उभारला २४५ धावांचा डोंगर –
सामन्याबद्दल बोलायचे, तर श्रेयस अय्यरच्या (८२) अर्धशतकाच्या आणि मार्कस स्टोइनिसच्या (३४) झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर २४६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ज्यामध्ये प्रभसिमरन सिंग आणि ४२ आणि प्रियांस आर्यने ३६ धावांचे योगदान दिले. ज्यामुळे पंजाब संघाने ० षटकांत सहा गडी गमावून २४५ धावा केल्या. आयपीएलमधील ही त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. हैदराबादकडून हर्षल पटेलने चार आणि इशान मलिंगाने दोन विकेट घेतल्या.





