SRH vs GT : मोहम्मद सिराजचा हैदराबादविरुद्ध कहर! आयपीएलमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

SRH vs GT Mohammed Siraj completes 100 wickets in IPL : यपीएल २०२५ मधील १९व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने गुजरातसमोर १५३ धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान या सामन्यात लोकल बॉय मोहम्मद सिराजच्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या सामन्यात सिराजने कमाल करत हेड-अभिषेकसह चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. या शानदार कामगिरीच्या जोरावर मोहम्मद सिराजने मोठा पराक्रम केला.
मोहम्मद सिराजने हैदराबादविरुद्ध दमदार प्रदर्शन करताना आपल्या आयपीएल कारकीर्दीतील १०० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर, गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळे त्यांना हैदराबाद संघाला १५२ धावांवर रोखता आलं. या सामन्यात मोहम्मद सिराजने चार षटकांत १७ धावा देत ४ विकेट घेतल्या.
सिराज ही कामगिरी करणारा ठरला १२ वा भारतीय वेगवान गोलंदाज –
मोहम्मद सिराज हा आयपीएल २०२५ च्या हंगामात गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. सिराजने या हंगामात आतापर्यंत ९ विकेट घेतल्या आहेत. यासह सिराजने आयपीएलमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यातही यश मिळवले, ज्यामध्ये तो आयपीएलमध्ये १०० विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा १२ वा भारतीय वेगवान गोलंदाज बनला.
A memorable 💯
The fiery Mohd. Siraj completes 1️⃣0️⃣0️⃣ #TATAIPL wickets as he gives #GT a dream start 🔥#SRH are 45/2 at the end of powerplay.
Updates ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#SRHvGT | @mdsirajofficial pic.twitter.com/UeFNX8xBVM
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
सिराजने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे, त्याची याआधीची सर्वोत्तम कामगिरी २०२३ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध २१ धावांत ४ विकेट्स होती. मोहम्मद सिराज आयपीएलमध्ये १०० विकेट्स पूर्ण करणारा २६ वा गोलंदाज ठरला आहे.
हेही वाचा – SRH vs GT : सिराजने अभिषेकला बाद करताच काव्या मारनने वेधलं सर्वांच लक्ष, रिॲक्शन होतेय व्हायरल
या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादची फलंदाजीची कामगिरी आतापर्यंत खराब राहिली आहे, गुजरात टायटन्सविरुद्धची त्यांची १५२ धावसंख्या ही २०२४ च्या आयपीएल हंगामानंतरची त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी, २०२४ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या.





