SRH vs CSK : चेन्नईच्या ‘सुपर किंग्स’ला हैदराबादचा दणका! शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला थरार; अभिषेक-क्लासेनची अर्धशतकं
SRH vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना रोखून धरले

SRH vs CSK Sunrisers Hyderabad defeated Chennai Super Kings : आयपीएल २०२६ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) आपल्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) १० धावांनी पराभव करत थरारक विजय नोंदवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना रोखून धरले.
अभिषेक-क्लासेनच्या फटकेबाजीनंतर इशानचा भेदक मारा –
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १९४ धावांचे तगडे आव्हान उभे केले होते. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्सचा संघ ८ बाद १८४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. सीएसकेचा या हंगामातील हा चौथा पराभव ठरला आहे. त्याचबरोबर सनराझर्स हैदराबादने हंगामातील तिसऱ्या विजयाची नोदं केली, ज्यामध्ये अभिषेक-क्लासेनच्या फटकेबाजीनंतर इशान मलिंगाच्या भेदक गोलंदाजीने विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Holding their nerves and jumping into the Top 4⃣ on the points table 🧡@SunRisers make it 🔙 to 🔙 victories with a last-over win against #CSK 👏
Scorecard ▶️ https://t.co/uJG04r8iXD #TATAIPL | #KhelBindaas | #SRHvCSK pic.twitter.com/8EdGMHWgPA
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
अभिषेक आणि क्लासेनची फटकेबाजी –
Innings Break!
Fifties for Abhishek Sharma and Heinrich Klaasen 🤝
3⃣ wickets each for Jamie Overton and Anshul Kamboj 👌#CSK‘s chase coming up! ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/uJG04r8iXD #TATAIPL | #KhelBindaas | #SRHvCSK pic.twitter.com/syNHwekrza
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ५.५ षटकांत ७५ धावांची सलामी दिली. अभिषेक शर्माने केवळ १५ चेंडूत अर्धशतक ठोकत वादळ निर्माण केले. त्याने २२ चेंडूत ५९ धावा कुटल्या. हेडने २३ धावा केल्या, तर कर्णधार इशान किशन शून्यावर बाद झाला. मधल्या फळीत हेनरिक क्लासेनने जबाबदारीने खेळत ३९ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. चेन्नईकडून अंशुल कंबोज आणि जेमी ओवरटन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
चेन्नईची झुंज ठरली अपयशी –
Travis Head ✅
Ishan Kishan ✅Mukesh Choudhary announces his arrival in #TATAIPL 2026 with two big wickets 👏
Updates ▶️ https://t.co/uJG04r7L85 #KhelBindaas | #SRHvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/UC7Dc2nMOj
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2026
प्रत्युत्तरात १९५ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून इरादे स्पष्ट केले होते, पण तो ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड (१९) आणि आयुष म्हात्रे (३०) यांनी वेगाने धावा जमवल्या. मधल्या फळीत सर्फराझ खानने २५ आणि शिवम दुबेने २१ धावा करत विजयाचा प्रयत्न केला, पण हैदराबादच्या इशान मलिंगाने ३ विकेट्स घेत चेन्नईच्या फलंदाजीची कंबर मोडली. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १८ धावांची गरज होती, मात्र हैदराबादच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांना हार मानावी लागली.





