CSK vs SRH : ‘RCB प्रमाणे आम्हीही…’, प्लेऑफमध्ये पोहोचण्याबाबत नितीश रेड्डीने व्यक्त केला विश्वास

CSK vs SRH Nitish Reddy optimistic about IPL 2025 playoff : आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करत आहे. २५ एप्रिल रोजी झालेल्या या हंगामातील ४३ व्या सामन्यात, एसआरएचने चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून पराभव करून आपल्या आशा जिवंत ठेवल्या. सामन्यानंतर, एसआरएचच्या नितीश रेड्डीने आशा व्यक्त केली की संघ अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. यासाठी त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे उदाहरण दिले.
आरसीबीप्रमाणे आम्हीही करू शकतो पुनरागमन –
सीएसकेवर विजय मिळवल्यानंतर, एसआरएच संघ ९ सामन्यांत ३ विजय आणि ६ पराभवांसह पॉइंट टेबलमध्ये ८ व्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी हैदराबादला त्यांचे सर्व सामने जिंकावे लागतील. सामन्यानंतर, त्यांचा अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी म्हणाला की, एसआरएचला अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा आहे.
🚨 INSPIRED BY RCB 🚨
Nitish Reddy said — Following RCB’s example from last year, we want to win every game now.#SRHvsCSK #NitishReddy #CSKvsSRH pic.twitter.com/3M4tGjjr1P
— Vivek Kumar (@Cric8Vivek) April 25, 2025
आरसीबीने सलग ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये मिळवले होते स्थान –
गेल्या हंगामाचे उदाहरण देताना तो म्हणाला, “गेल्या हंगामात, आरसीबीनेही शेवटचे सर्व सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आम्ही देखील हा पराक्रम करू शकतो.” गेल्या हंगामात आरसीबीने सलग ६ सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. नितीश रेड्डी म्हणाला की, संघातील खेळाडू प्रत्येक सामना जिंकण्यासाठी त्यांचे १०० टक्के योगदान देतील. तो म्हणाला की कामिंदू मेंडिससोबतच्या त्याच्या भागीदारीमुळे सामना सोपा झाला.
हेही वाचा – RCB vs RR : विराट कोहलीने का जोडले हात? दिनेश कार्तिकचा खुलासा; म्हणाला, ‘मी इतका मोठा नाही की…’
नितीश रेड्डी म्हणाला, “आम्ही दोघांनी मोठे फटके खेळण्याऐवजी एकेरी आणि दुहेरीवर धाव घेण्यावर लक्ष केंद्रित केले. मोठ्या बाऊंड्रीमुळए दोन धावा घेणे सोपे झाले आणि आम्ही आरामात लक्ष्य गाठले.” यावेळी त्याने चेन्नईचा फिरकी गोलंदाज नूर अहमदचे कौतुक केले आणि सांगितले की त्याने चेपॉकच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी केली.





