Fan Black Magic : हैदराबादच्या चाहत्याने लाईव्ह सामन्यात केली ‘काळी जादू’! लिंबू फिरवताच शिवम दुबेची दांडी झाली गुल, पाहा VIDEO
Fan Black Magic : हैदराबादच्या एका चाहत्याने चक्क 'काळी जादू' केल्याचा दावा सध्या इंटरनेटवर केला जात आहे.

Black Magic In SRH vs CSK Match Video Viral : आयपीएला थरार केवळ मैदानातील चौकार-षटकारांपुरता मर्यादित नसून प्रेक्षकांमधील काही अजब किस्सेही सोशल मीडियावर खळबळ उडवून देत आहेत. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामन्यादरम्यान असाच एक विचित्र प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्याला नेटकरी चक्क ‘लिंबू तंत्र-मंत्र’ म्हणत आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
क्रिकेटमध्ये नशिबाचा भाग मोठा असतो असे म्हणतात, पण हैदराबादच्या एका चाहत्याने चक्क ‘काळी जादू’ केल्याचा दावा सध्या इंटरनेटवर केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक सनरायझर्स हैदराबादचा फॅन हातात लिंबू घेऊन काहीतरी पुटपुटताना आणि विचित्र हालचाली करताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने आपली ही ‘युक्ती’ केल्यानंतर लगेच पुढच्याच चेंडूवर चेन्नईचा फलंदाज शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला.
Black magic live 😭 pic.twitter.com/rzJYd6kjti
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) April 19, 2026
परफेक्ट टायमिंगमुळे उडाली खळबळ –
हा संपूर्ण प्रकार इतक्या अचूक टायमिंगमध्ये घडला की, स्टेडियममध्ये बसलेले इतर प्रेक्षकही अवाक झाले. जसा फलंदाज बाद झाला, तसा तो चाहता आनंदाने नाचू लागला. @GemsOfCricket नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. चाहत्यांच्या मते, चेन्नईच्या पराभवाचे कारण बॅटिंग नसून हे ‘लिंबू अस्त्र’ आहे.
नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस –
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा पूर आला आहे. एका युजरने सुचवले की, “बीसीसीआयने आता डीआरएस (DRS) ऐवजी ‘लिंबू रिव्ह्यू सिस्टम’ आणली पाहिजे.” तर दुसऱ्याने म्हटले, “हा फॅन तर तंत्र-मंत्र लीग खेळायला आला आहे की काय?” काही लोक याला निव्वळ योगायोग मानत असले, तरी आयपीएल २०२६ मधील हा सर्वात ‘फनी’ आणि सस्पेन्स देणारा क्षण ठरला आहे. या घटनेने हे सिद्ध केले आहे की, आयपीएलमध्ये खेळाडूंसोबतच चाहतेही सामन्याचा निकाल लावण्यासाठी स्वतःची पूर्ण ताकद लावतात.





