दिल्ली – सभ्य गृहस्थांचा खेळ अशी प्रतिमा असलेल्या क्रिकेटमध्ये गुरुवारी दोन अशा घटना घडल्या की त्यामुळे पुन्हा एकदा या खेळाच्या प्रतिमेला गालबोट लागले. एक वांशिक टीपणीची घटना घडली ती पाकिस्तानविरुद्ध पंतप्रधान इलेव्हन (Prime Minister’s XI vs Pakistan) या सामन्यात तर, दुसरी घटना घडली ती लेजंड्स लीगमध्ये. एस . श्रीशांत (Sreesanth-Gambhir Controversy) गोलंदाजी करताना गौतम गंभीरने त्याला फिक्सर म्हणून हिणवले. या दोन्ही घटनांची दखल घेत पाकविरुद्धच्या ब्रॉडकास्टरने चुक सुधारली तर दुसरीकडे गंभीरला पंचांनी कठोर शब्दात ताकीद दिली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंमध्ये गेल्या काही वर्षांपासून लेजंड्स लीग स्पर्धा खेळवली जाते. त्यात इंडिया कॅपिटल्सकडून खेळताना गौतम गंभीरने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या ५१ धावांच्या खेळीत त्याने ३० चेंडूत ७ चौकार व १ षटकार फटकावला. त्यात श्रीशांतच्या गोलंदाजीवर त्याने अफलातून फटकेबाजी केली. यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दीक चमकमकही उडाली. ते नक्की काय बोलले हे सामना संपल्यावर श्रीशांतने सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यात गंभीरने श्रीशांतला फिक्सर म्हणून हिणवले व या दोघांत भर मैदानात वाद निर्माण झाला. अखेर अन्य खेळाडू व पंचांनी हस्तक्षेप करत पुढील अनर्थ टाळला.
२०१३ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याबद्दल बीसीसीआयने श्रीशांतवर बंदी घातली होती. त्यानंतर हा कालावधी संपल्यावर श्रीशांतने देशांतर्गत तसेच लेजंड्स लीग क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, त्याने भूतकाळात केलेल्या गोष्टींची आठवण करुन देताना गंभीरने त्याच्यावर शेरेबाजी केली व हा सामना कामगिरीपेक्षा या घटनेमुळेच जास्त चर्चिला गेला.
या लढतीत इंडिया कॅपिटल्सने २० षटकांत ७ गडी गमावून २२३ धावा केल्या. त्यात श्रीशांतच्या ३ षटकांत ३५ धावा काढल्या गेल्या व तो केवळ एकच गडी बाद करु शकला. गुजरात जायंट्सचा डाव २० षटकांत ७ बाद २११ असा रोखत इंडिया कॅपिटल्सने हा सामना १२ धावांनी जिंकला. ख्रिस गेलने गुजरातकडून ५५ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची खेळी केली.
पाकच्या सराव सामन्यात वांशिक टीका
ऑस्ट्रेलियात दाखल झालेला पाकिस्तानचा संघ पंतप्रधान इलेव्हन संघांशी सराव सामना खेळत आहे. त्यात या सामन्याचे प्रक्षेपण करत असलेल्या वाहिनीवर पकिस्तानी खेळाडूंचा अपमान होइल अशी वाक्यरचना वापरली गेली. संघाच्या नावाचा शॉर्टफॉर् करताना या वाहिनीने पाक असे म्हणण्याएवजी पाकी असे संबोधले.
पाकिस्तानमध्ये पाकी हा शब्द अपमानजनक मानला जातो. ही चुक लक्षात आल्यावर या वाहिनीने हा शब्द काढून पाक हा शब्द ठेवला. ही चुक ऑस्ट्रेलियाचे पत्रकार डॅनी सईद यांनी ही चुक निदर्शनास आणून दिल्यावर ही चुक सुधारण्यात आली. कॅनबेरात सुरु असलेल्या या लढतीत गुरुवारी दुसऱ्या दिवशी ही घटना घडली.
या लढतीत पाकिस्तानने पहिला डाव शान मसुदच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर ९ बाद ३९१ धावांवर घोषित केला. दुसर्या दिवशी खेळ थांबला तेव्हा पंतप्रधान इलेव्हनने आपल्या पहिल्या डावात २ गडी गमावून १४९ धावा केल्या आहेत. या कामगिरीच्या रच्चेपेक्षा जास्त गंभीर वाद प्रक्षेपण करत असलेल्या वाहिनीने केलेल्या चुकीमुळे घडला. अर्थात या वाहिनीने आपली चुक सुधारत पाकिस्तानची माफीही मागितली आहे.