महिला आयपीएस अधिकाऱ्याची सहकाऱ्यांकडूनच जासूशी..! प्रकरण समोर येताच मोठी खळबळ…

IPS Officer Jyestha Maitreyi । राजस्थान कॅडरच्या तेजतर्रार आयपीएस अधिकारी ज्येष्ठा मैत्रेयी सध्या चर्चेत आहेत. भिवाडी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक असलेल्या ज्येष्ठा यांनी नुकतेच त्यांच्या जिल्ह्यातील सायबर सेल इंचार्ज श्रवण जोशीसह सात पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांच्या लोकेशनची सतत जासूसी केल्याच्या आरोपात निलंबित केले आहे. या प्रकरणाची गडबड उडाल्यानंतर, जयपूर पोलिस मुख्यालयाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चला, जाणून घेऊया कोण आहेत ज्येष्ठा मैत्रेयी.
IPS Officer Jyestha Maitreyi । मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील रहिवासी
ज्येष्ठा मैत्रेयी मूळत: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव गिरीश चंद्र आर्य असून ते एमपी इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये कार्यरत आहेत, तर आई मंजू शासकीय हायर सेकेंडरी स्कूल, गुना येथे प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत.
IPS Officer Jyestha Maitreyi । लहानपणापासून आयएएस बनण्याची इच्छा
2018 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठा यांनी सांगितले होते की, लहानपणापासूनच त्यांना आयएएस बनायचे होते. या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. जरी त्या आयएएस बनू शकल्या नाहीत, तरी 2018 मध्ये संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय पोलिस सेवेत (IPS) अधिकारी बनल्या.
IPS Officer Jyestha Maitreyi । आयपीएस बनण्यापूर्वी डीएसपी
यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी ज्येष्ठा मैत्रेयी यांनी मध्य प्रदेश पब्लिक सर्विस कमिशनची परीक्षा दिली होती. 2014 मध्ये त्या परीक्षा उत्तीर्ण होऊन डीएसपी पदावर निवड झाल्या. काही काळ मुरैना जिल्ह्यात डीएसपी म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र, मनात आयएएस होण्याचे स्वप्न असल्यामुळे त्यांनी यूपीएससीची तयारी करत परीक्षा दिली.
IPS Officer Jyestha Maitreyi । ऑल इंडिया 156वी रँक
यूपीएससीच्या परीक्षेत ज्येष्ठा यांना ऑल इंडिया 156वी रँक मिळाली. त्यानंतर त्या राजस्थान कॅडरच्या आयपीएस अधिकारी झाल्या. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठा यांची पहिली पोस्टिंग उदयपूर जिल्ह्यातील गिरवा सर्कलमध्ये झाली. त्यानंतर त्या भीलवाड्याच्या एएसपी बनल्या, तसेच जयपूरच्या डीसीपी क्राइम पदावरही त्यांनी काम केले. त्यानंतर सिरोही, कोटपूतली, बहरोडमध्ये पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना भिवाडीच्या एसपी पदाची जबाबदारी देण्यात आली.
IPS Officer Jyestha Maitreyi । सुट्टीच्या वेळी लोकेशन ट्रेस करत होते
ज्येष्ठा मैत्रेयी ज्या जासूसी प्रकरणामुळे चर्चेत आहेत, त्याच्या प्राथमिक तपासात असे आढळले आहे की, ज्येष्ठा एसपी भिवाडी म्हणून जेव्हा सुट्टीवर असायच्या, तेव्हा सायबर सेल इंचार्ज श्रवण जोशी आणि त्याचे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांची लोकेशन सतत ट्रेस करत होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर जोशीसह सायबर सेलमधील सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे काम एससी-एसटी सेलच्या डीएसपीकडे सोपवण्यात आले आहे.
हे वाचले का ?जेपीएनआयसी म्हणजे काय? यावरून अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगींवर का करत आहे,’टीका’ ?





