स्पृहा जोशीचे छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ अभिनेत्यासोबत झळकणार मुख्यभूमिकेत

Spruha Joshi New Serial| सध्या अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नव्या मालिका भेटीस येत आहे. यातच आता ‘कलर्स मराठी’ वर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘कलर्स मराठी’ने नुकतंच सोशल मीडियावर नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी झळकणार आहे.
‘कलर्स मराठी’ वरील या नवीन मालिकेचं नाव ‘सुख कळले’ असं आहे. या मालिकेत स्पृहा जोशीसह अभिनेता सागर देशमुख पाहायला मिळणार आहे. याशिवाय मिमी खडसे ही बालकलाकार या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत एका जोडप्याची प्रेम कहाणी दाखवण्यात येणार असल्याचं प्रोमोवरून लक्षात येते.
या मालिकेचा प्रोमो पाहून कलाकार मंडळींसह स्पृहाच्या चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. मात्र ही मालिका कधीपासून सुरू होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्पृहाची नवी मालिका पाहण्यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. Spruha Joshi New Serial|
View this post on Instagram
दरम्यान, याआधी स्पृहा ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली होती. तर सागर देशमुख ‘झी मराठी’वरील ‘चंद्रविलास’ या मालिकेत सागर आनंद महाजन या भूमिकेत दिसला होता. पण स्पृहाच्या ‘लोकमान्य’ व ‘चंद्रविलास’ या मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळू शकला नव्हता. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याने तिच्या या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. Spruha Joshi New Serial|
हेही वाचा:





