Nagar : महात्मा फुले कृषि विद्यापीठात क्रीडा सप्ताहास प्रारंभ

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड यांचेहस्ते करण्यात आले.
यावेळी कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सचिन नलावडे, काष्टी (ता. मालेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेश गडगे, कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बाष्ठेवाड, डॉ. ममता पटवर्धन, प्रा. विक्रम पाटील, कॅप्टन डॉ. सुनील फुलसावंगे व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निदेशक तथा सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के उपस्थित होते.
या क्रीडा सप्ताहामध्ये मैदानी क्रीडा स्पर्धा, बॅडमिंटन, बुद्धिबळ,व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो या प्रकारातील क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये महाविद्यालयाचे 240 विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या क्रीडा सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निदेशक तथा सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.





