जलतरण स्पर्धा : चॅम्पियन्स क्‍लबला सर्वसाधारण विजेतेपद

कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्‍यपद जलतरण स्पर्धा

पुणे – पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्‍यपद जलतरण स्पर्धेत चॅम्पियन्स क्‍लबने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर हामोर्नी क्‍लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
टिळक जलतरण तलावावर झालेल्या या स्पर्धेत चॅम्पियन्स क्‍लबने 280 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळवले. 229 गुणांसह हामोर्नी क्‍लबला उपविजेतेपदावर नाव कोरले.

ग्रुप 1 ते 4 मध्ये डेक्कन जिमखाना संघाने 217 गुणांसह विजेतेपद, तर चॅम्पियन्स क्‍लब 163 गुणांसह उपविजेता राहिला. ग्रुप 5 ते 6मध्ये चॅम्पियन्स क्‍लबने 34 गुणांसह बाजी मारली, तर डेक्कन जिमखाना 32 गुणांसह उपविजेता राहिला.
पारितोषिक वितरण समारंभास पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय दामले, उपाध्यक्ष शशांक कुलकर्णी, सचिव जय आपटे, कोषाध्यक्ष नीता तळवलीकर, कार्याध्यक्ष अजित सोहोनी, सहसचिव अमित गोळवलकर, शौर्य करंदीकर आदी उपस्थित होते.

वैयक्तिक विजेतेपद (मुले-मुली)

6 वर्षांखालील : स्वराज भट्टड (डेक्कन जिमखाना), सिया चौधरी (सोलारिस).

8 वर्षांखालील : उदयन देशमुख (हार्मोनी क्‍लब), अमोली नेरलेकर (चॅम्पियन).

10 वर्षांखालील : सम्यक रामचंद्र (चॅम्पियन), दीप्ती टिळक (डेक्कन जिमखाना).

11 वर्षांखालील : शाश्वत भोमे (हार्मोनी), आरत्रिका बिस्वास (डीआरव्हीपीएफ).

14 वर्षांखालील : तनीष कुडले (स्पार्क), डॉली पाटील (केपी).

17 वर्षांखालील : शुभम धायगुडे (डेक्कन जिमखाना), शाल्मली वाळुंजकर (चॅम्पियन).

वरिष्ठ गट : मिहीर आंब्रे (चॅम्पियन), युगा बिरनाळे (हार्मोनी).

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.