बॅडमिंटन शिबिरास बुधवारपासून प्रारंभ
Updated On:

बेंगळुरू – भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) व भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बीएआय) सराव शिबिरास येत्या 1 जुलैपासून प्रारंभ होत आहे. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने देशांतर्गत स्पर्धांना अद्याप परवानगी मिळालेली नसली तरीही शिबिर आयोजित करण्यासाठी तेलंगणा सरकारने अनुमती दिली आहे.
साइच्या हैदराबाद येथील केंद्रात हे शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात देशाच्या ऑलिम्पिकपदक विजेत्या खेळाडू पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांच्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
संघटनेच्या देशांतर्गत स्पर्धा सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलेल्या असल्या तरीही सरावाला प्रारंभ झाल्यामुळे आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंची तयारी होणार आहे. बेंगळुरू व दिल्लीतील शिबिराला यापूर्वीच प्रारंभ झाले आहे.





