लक्ष्मीनगरमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आळंदी, – लक्ष्मीनगर (चऱ्होली खुर्द, ता. खेड) येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विश्रांतवड प्रतिष्ठान व श्रीशिव समर्थ क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मोरया रक्तपेढी चिंचवड यांच्या सहकार्यातून सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदानानंतर रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर पगडे, धनंजय थोरवे, माजी सैनिक दुर्गादास इंगळे, शिवाजी धुळगंड, भाऊसाहेब माळशिखरे, ज्ञानेश्वर माहुरे, अनंता गुंड, शिवानंद पाटील, बालाजी माकणे, बळीराम बनसोडे, बबलू बनसोडे, विशाल साळुंखे, मनोज साळुंखे, संजय वगरे, जीवन सुरवसे, राजू पांचाळ, नितीन रेहपाडे, प्रशांत चक्रनारायन, सदाशिव पोकळे, रामदास भगत, गणेश पायगन, बाळासाहेब कदम, देवीदास पांचाळ, जय नाझरकर, यांसह मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबीरात, सिद्धेश्वर पगडे, श्रीराम पवळ, गणेश मोटकर, किरण मोटकर, शिवाजी जावीर, तुकाराम चोरमले, महेश गडदे, राजेश धुळगंड, सुधीर वाघमारे, परमेश्वर फड, विशाल नाझरकर, संजीव नाझरकर, रेवण्णाथ जाधव, निळकंठ दिघे, गंगाराम हातागळे, दत्ता काळे, अनिल साळुंके, विकास मोरे, लिलाधर पाटील, अविनाश ननवरे, विजय देवकाते, मेघराज भांगे, सुमित कातकडे, रणजित पवार, सचिन धावडे, उमेश शिंगणे, सोमनाथ भालेराव, श्रीकांत चव्हाण, राजेंद्र पाटील, ऋतिक धाडीगावकर, सुरज पिसे, निलेश पावणे, कृष्णा नवले, बिभीषण नरवटे, निलेश वैद्य, सागर बनसोडे, कृष्णा खुरडे, तुलशीराम खामकर, दादा पांचाळ, अशा 40 जणांनी रक्तदान केल्याची माहिती शिव समर्थ क्लिनिकचे डाॅ. विशाल नाझरकर यांनी दिली.
रक्तदानाचे फायदे काय?
तज्ज्ञांच्या मतानुसार, रक्तदानाचा उद्देश केवळ गरजू लोकांना रक्त उपलब्ध करून देणं हा नाही. तर याचे इतरही अनेक फायदे आहेत.
– रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
– रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते आणि यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
– नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो.
– याशिवाय रक्तदान केल्याने नवीन रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया गतिमान होते.
रक्तदान केल्यामुळे शरीरातील रक्त संपुष्टात येतं का? शरीर कमकमुवत होतं का?
रक्तदान केल्याने शरीरातील रक्त संपतं, हा गैरसमज आहे. प्रौढ शरीरात सरासरी 5 लिटर रक्त असतं. रक्तदान करताना जास्तीत जास्त 450 मिली रक्त आपल्या शरीरातून बाहेर काढलं जातं. निरोगी व्यक्तीच्या शरिरात तेवढं रक्त 24 ते 48 तासांत पुन्हा तयार होतं. रक्तदान केल्याने शरीर कमकुवत होतं, असंही अनेकांना वाटतं. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. कारण रक्तदान केल्यानं शरीरात नवीन रक्त आणि रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया जलदगतीनं होते. रक्तदानामुळे झालेली रक्ताची हानी शरीर काही दिवसांत भरुन काढतं.
रक्तदान करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खावे?
रक्तदान केल्यानंतर काही लोकांना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. अशा परिस्थितीत रक्तदान करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. रक्तदान करण्यापूर्वी किंवा रक्तदानादरम्यान रक्तदात्यानं उपवास केलेला नसावा. रक्तदानापूर्वी कमीतकमी 4 तास अगोदर त्यानं जेवण केलेलं असावं. तसंच रक्तदात्यानं रक्तदानापूर्वी दारू प्यायलेली नसावी. रक्तदान करण्यापूर्वी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसंच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही लोहयुक्त पदार्थ जसे हिरव्या पालेभाज्या, रताळे, बीन्स, बीट, ब्रोकोली, इत्यादी हिरव्या भाज्या खाऊ शकता. रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश करू शकता. फळांच्या सेवनानं अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.





