Khopoli News : आई-लेकाचे एकाच वेळी रक्तदान; खोपोलीत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Khopoli News : माजी नगराध्यक्ष स्व. लक्ष्मण साबळे यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त खोपोलीत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Khopoli News – खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय लक्ष्मण साबळे यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (दि. २७) विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला खोपोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत प्रतिसाद दिला. स्व. लक्ष्मण साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र यशवंत साबळे,
तुकाराम साबळे आणि नातू उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांच्या पुढाकारातून दरवर्षी लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. यावर्षी कर्करोग तपासणी, मॅमोग्राफी, मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काशी होम प्रा. लि.चे संस्थापक यशवंत साबळे यांनी मातोश्री काशीबाई साबळे यांच्या उपस्थितीत स्व. लक्ष्मण साबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी अभंगवाणी कार्यक्रम पार पडला असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. साबळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपनगराध्यक्ष विक्रम साबळे आणि त्यांच्या आईने यावेळी स्वतः रक्तदान करून नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले. आई-लेकाने केलेल्या या रक्तदानाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, आरोग्य सभापती मयुरी शेलार, बांधकाम सभापती अनिल सानप, सभापती प्रतीक्षा रेटरेकर, नगरसेवक दिनेश थोरवे, संदीप पाटील, राहुल गायकवाड, विनायक तेलवने, अमित फाळे,
नगरसेविका सानिया शेख, अश्विनी अत्रे, रूपाली जाधव, रेश्मा गायकवाड, श्वेला आहीर, विनिता आवटी, मोहन अवसरमल, अविनाश तावडे, सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख, सोनू शेलार, अतुल पाटील, ह.भ.प. काशिनाथ महाराज पारठे, नरेश पालांडे, शेखर जाभले, तात्या रिठे, विवेक पाटील, अनिल मिंडे, मोहन केदार आदी उपस्थित होते.




