Newasa News : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवगर्जना उत्सव समितीच्यावतीने आज काळे मेडिकलजवळ आलवाने कॉम्प्लेक्स परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या रक्तदान शिबिराला नेवासे पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश पाटील,माजी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे,नगरसेवक जितेंद्र कुऱ्हे, मुकिंदपूरचे माजी उपसरपंच गणेश माटे,अशोक उपळकर, मुन्ना चक्रनारायण,पत्रकार राजेंद्र वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. नेवासे फाटा येथील शिवगर्जना उत्सव समितीच्यावतीने राष्ट्रीय स्वयंमसेवक संघ जन कल्याण समितीच्या नगर येथील जनकल्याण रक्त केंद्राचे डॉ. वसंत झेंडे,जनसंपर्क अधिकारी शरद बळे, विनिता धामणकर, किरण शिंदे, प्रियांका आढागळे, वेदांत हरिश्चंद्रे,मयूर खेडकर,किशोर यादव, सामाजिक कार्यकर्ते राजेश आढाव यांनी रक्त दात्यांचे रक्त संकलित केले. यावेळी नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला येथील शिवगर्जना उत्सव समितीच्यावतीने दरवर्षी रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असल्याबद्दल उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. शिवगर्जना उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे अथक परिश्रम घेवून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.