satara | स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे गतीने करा

सातारा, (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार अरोग्य सुविधा मिळण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत सुरु असलेली कामे गतीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यवाही आढावा बैठकी झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे आदी उपस्थित होते.
हॉस्पीटल मॅनजमेंट सिस्टीम लवकरात लवकर अद्ययावत करावी, अशा सूचना करुन या सिस्टीमचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांन प्रशिक्षण द्यावे. निर्लेखन आवश्यक असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्लेखनाची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करुन नवीन इमारत बांधणीच्या कामांच्या निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.
त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत सुविधा कार्यान्वीत करण्यासाठी निधीचे अंदाजपत्रके तयार करुन निधीची मागणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.





