Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच एफडीए आयुक्तपदावरून बदली झाल्याची चर्चा; स्वत: दिले स्पष्टीकरणं
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती

Tukaram Mundhe : एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू आहे. आतापर्यंत एफडीएकडून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर आणखी एक जबाबदारी देण्यात आली. MPSC मधील परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणांच्या तपासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या सचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी IAS तुकाराम मुंढे यांच्यावर सोपवण्यात आली. (Tukaram Mundhe)
यानंतर तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पण या सर्व अफवा असून त्यांनी स्वत: याबाबत सत्य सांगितले आहे. तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘एक्स’ वर पोस्ट करत स्पष्ट केले आहे की, त्यांची एफडीएच्या आयुक्तपदावरून कोणतीही बदली झालेली नाही. (Tukaram Mundhe)
No, I have not been transferred from FDA.
नाही, माझी FDA मधून बदली झालेली नाही.I continue to serve as Commissioner, FDA Maharashtra. Our fight against unsafe, substandard, adulterated food and spurious, substandard drugs goes on.
मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. भेसळयुक्त अन्न आणि निकृष्ट औषधांविरुद्धची आमची लढाई सुरूच आहे.
#TukaramMundhe #Trust
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) October 12, 2026
तुकाराम मुंढे यांची पोस्ट
“नाही, माझी एफडीएमधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र येथे आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. असुरक्षित, निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त अन्न आणि बनावट औषधांविरुद्धची आमची लढाई अशीच पुढेही सुरूच राहील,” असे सांगत त्यांनी आपल्यावरील बदलीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की, ते एफडीए आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच एमपीएससी चौकशी समितीच्या सचिवपदाचे कामही पाहणार आहेत.
पुण्यात MPSC आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षांमधील विविध अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पारदर्शक अधिकाऱ्यामार्फत व्हावी अशी ठाम मागणी केली होती. विद्यार्थ्यांचा तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कार्यशैलीवर असलेला विश्वास लक्षात घेऊन राज्य सरकारने ही मागणी मान्य केली आणि चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली.
या संदर्भातील घोषणा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी केली. मात्र यावरून तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या एफडीए आयुक्तपदाच्या जबाबदारीचं काय होणार? त्यांची बदली झाली का? असे सवाल उपस्थित करण्यात येत होते. यावर आता स्वत: तुकाराम मुंढे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. Tukaram Mundhe
हेही वाचा:
Manchar : मंचर बाजार समितीकडून शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत अपघात विमा





