पुणे-जबलपूर-पुणे विशेष गाडीला मुदतवाढ
Updated On:

पुणे – रेल्वेने पुणे-जबलपूर-पुणे विशेष गाडीला मुदतवाढ दिली असून, ही गाडी येत्या 29 जूनपर्यंत धावणार आहे.
रेल्वेची नियमित प्रवासी सेवा अद्यापही स्थगित असल्याने अनलॉकपासून विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवासी संख्या अधिक असल्याने मागील काही महिन्यांपासून या विशेष गाड्यांना सातत्याने मुदतवाढ देण्यात येत आहे.
जबलपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी 28 जूनपर्यंत आणि पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष गाडी 29 जूनपर्यंत धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांचे आरक्षण करणे गरजेचे असून, कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. यासह नागरिकांनी प्रवासादरम्यान करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





