दत्तवाडी पोलीस स्टेशनमधील विशेष पोलीस अधिकाऱ्याचे कोरोनामुळे निधन
Updated On:

पुणे : दत्तवाडी पोलीस स्टेशन मध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणून गेल्या तीन महिन्यापासून कार्यरत असणारे हमीद अलारसाहेब इनामदार( वय ३९, रा. जनता वसाहत पर्वती, पुणे) यांचे दि.२४ जुलै २०२० रोजी कोरोनामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना निधन झाले आहे.
त्यांच्या मृत्यूमुळे जनता वसाहत परिसरात लोकांना मोठा धक्का बसला आहे. जनता वसाहत भागात त्यांनी गरीब मुलांना शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मदत केल्याने अनेक विद्यार्थी हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता जनता हॉल येथे दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुगल मिट श्रद्धांजली आयोजित केली आहे. त्या मध्ये सर्व विशेष पोलीस अधिकारी व दत्तवाडी पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.





