पनवेलहून विशाखापट्टणमसाठी सोडलेली ऑक्सिजन ट्रेन नागपूर स्थानकात दाखल
Updated On:

पुणे : ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेत, रेल्वेकडून विशेष पनवेलहून विशाखापट्टणमसाठी ऑक्सिजन ट्रेन सोडली होती. आज रात्री 8 वाजता ही ट्रेन नागपूर स्थानकात दाखल झाली.
विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आज सायंकाळी 8.10 वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली. नागपूर स्थानकात 3 टँकर उतरविण्यात येणार आहे.
ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या सकाळी नाशिकरोड स्थानकात पोहोचेल असून, स्थानकात देखील टँकर उतरवण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.





